Panhala Fort | कोल्हापूरचा पन्हाळ गड सात महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला!

कोल्हापुरातील पन्हाळगडाचे दरवाजे खुले
कोल्हापुरातील पन्हाळगडही आजपासून अधिकृतरित्या खुलं होणार आहे. सात महिन्यानंतर पन्हाळगडाचे दरवाजे आजपासून पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. पन्हाळा नगरपरिषदेने हा निर्णय घेतला आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पन्हाळगडावर पर्यटकांना परवानगी असेल. वेळेचे बंधन, सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, खाद्यपदार्थ पार्सल स्वरुपात देणे, सरकारने घालून दिलेल्या या नियम आणि अटींचं पालन करण्याचं आवाहन नगराध्यक्ष रुपाली धडेल यांनी केलं आहे. जवळपास सात महिने गडावर पर्यटकच नसल्याने 70 टक्के व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आजपासून पन्हाळा गड पर्यटकांसाठी खुला झाल्याने इथल्या अर्थकारणाला गती मिळेल, असं सांगत व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola