Kolhapur: नदीतील ऑक्सिजन पातळी घटली, नदी प्रदुषित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची प्रदूषण पातळी किती मोठ्या प्रमाणात वाढली असेल याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आलाय. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या बाजूला हजारो मासे तडफडत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय. पंचगंगा नदीच्या प्रदूषणानं पाण्याची ऑक्सिजन पातळी घटलीय परिणामी प्राणवायूसाठी माशांची ही तडफड सुरू आहेत. माझाचे प्रेक्षक महादेव पिसाळ यांनी हा व्हिडीओ शूट केलेला आहे. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूरकरांकडून होतेय.
Continues below advertisement