Kolhapur Jilha Parishad Elections : जिल्हापरीषद निडवडणुकीत कोल्हापुरात महायुतीची समीकरणं बदलणार?

Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला दहापैकी दहा जागांवर यश मिळाले. यामुळे जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील तिन्ही पक्षांकडून इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. ही गर्दी महायुतीसाठी जागावाटपाची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाने जागा वाटपामध्ये सर्वाधिक वाटा मिळावा अशी भूमिका घेतली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याला बळी दिला जाणार नाही. पक्ष कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहील. तर हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, "जिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकांवर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेलं आहे." यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढणार आहे. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारीही सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola