Kolhapur Lockdown : कोल्हापुरातील कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला आहे. कडक लॉकडाऊन नाही मात्र जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी कडक लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला होता. आज सकाळी 11 वाजल्यापासून नवे निर्बंध लागू होणार होते. मात्र लॉकडाऊनचा निर्णय मागे घेत जनता कर्फ्यूचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Continues below advertisement