Kolhapur Kognoli Toll Naka : ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर रोखलं
Kolhapur Kognoli Toll Naka : ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर रोखलं
विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे अॅड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष ठरले आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे 1962 आणि 1967 असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते. तसेच सयाजी सिलम हेही दोनवेळा अध्यक्ष होते, पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता. संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे 11 वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळेल. आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणुन राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. यानंतर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.