Kolhapur Jyotiba : जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मुलां प्रवेश नसल्याने भाविक संतप्त

रविवारच्या दिवशी दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी भाविक आतुर झालेले असतात. आज देखील कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीरत्नागिरी म्हणजे जोतिबा डोंगरावर राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली. कोरोना संकटामुळे अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरामध्ये लहान मुलांना प्रवेश दिला जात नाही. मात्र अनेक भाविक मुलांसह आल्यानं मंदिराच्या प्रवेशद्वारावर वादावादीच्या घटना घडत आहेत. विशेषतः परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून आलेल्या नागरिकांना यामुळे मोठी अडचण होते आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola