Kolhapur Jaggery : कोल्हापूरच्या बाजार समितीत गूळ सौद्यांना सुरूवात, जाणून घ्या किती मिळाला दर...

Continues below advertisement

कोल्हापूरचा गूळ देशभर प्रसिद्ध आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या गुळ सौद्याकडे देशभरातील गुळ व्यापारी आणि शेतकऱ्यांचे लक्ष असतं. परंपरेप्रमाणे आज दिवाळीच्या पाडव्यादिवशी कोल्हापूरच्या बाजार समितीत गूळ सौद्यांना सुरूवात झाली आणि यावेळी व्यापारी आणि शेतकरी यांच्यात मोठा उत्साह होता. आज पहिल्याच दिवशी बाजार समितीत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली. गुळाला पहिल्याच दिवशी किती दर मिळणार याचीही उत्सुकता होती तर आज पहिल्या दिवशी गुळाला 3400 ते 4200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.  आता हा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा कमी असला तरी येणाऱ्या काही दिवसात गुळाला दर वाढवून मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram