Kolhapur Flood : Shirol मध्ये पूरग्रस्तांचा भव्य मोर्चा, मोर्चाला सर्वपक्षाचा पाठींबा : ABP Majha
कोल्हापुरात विविध मागण्यांसाठी पूरग्रस्त रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. शिरोळला महापुराचा सर्वाधिक फटका बसलाय. पुरात नुकसान झालेला ऊस घेऊन पूरग्रस्त मोर्चात सहभागी झाले. या आंदोलनात महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. या मोर्चाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दर्शवला.