Gokul Milk Protest Kolhapur : कोल्हापुरात दूध उत्पादकांचा मोर्चा, जवाब दो मोर्चा

Continues below advertisement
कोल्हापूरमध्ये (Kolhapur) गोकुळ दूध संघाच्या (Gokul Milk) विरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांसह मोर्चा काढला आहे. डिबेंचरमधील 40% कपातीमुळे हा संघर्ष पेटला असून, यात गोकुळच्या संचालिका श्रमिका महाडिक (Shramika Mahadik) आणि चेअरमन नवीन मुश्रीफ (Navin Mushrif) यांची नावे चर्चेत आहेत. शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की, 'आमचे जे डिबेंचरचे पैसे जादा जी कपात करून घेतलेले आहेत ती आम्हाला तातडीने परत करा'. पूर्वी ही कपात १५% होती, मात्र आता ती ४०% केल्याने संस्था आणि शेतकरी दोघांचेही नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनावेळी गोकुळचे चेअरमन आणि हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीन मुश्रीफ परदेश दौऱ्यावर आहेत. संचालिका श्रमिका महाडिक यांच्या मते हा मोर्चा गोकुळ विरोधात नसून प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola