Sugarcane FRP | कोल्हापुरात ऊसदर आंदोलन चिघळलं, एक ट्रॅक्टर पेटवला | ABP Majha
कोल्हापुरातील शिरोळ आणि हातकंणगले तालुक्यात ऊसदराचं आंदोलन चिघळलं आहे. कर्नाटकमधील कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. दानोळी इथे अथणी शुगर्सचा एक ट्रॅक्टर पेटवला तर सहा ट्रॅक्टरमधील हवा सोडून ऊसवाहतूक रोखली. तर हातकंणगलेमधील आळते इथे व्यकंटेश्वरा कारखान्याच्या दोन ट्रॅक्टरची हवा सोडून ऊसवाहतूक रोखण्यात आली.