Kolhapur : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं आज मतदान,काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपची शाहू आघाडी
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं आज मतदान होतंय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी निवडणूक लढवतेय. या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर भाजपही आहे. तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेनं शेकापबरोबर वेगळी आघाडी करून आव्हान दिलंय. 21 पैकी 6 जागांवर बिनविरोध निवडणूक झालीय. तर उर्वरित १५ जागांसाठी ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यासाठी आज मतदान होतंय.