Viral Video : कोल्हापूरात 'JCB'तून नवदाम्पत्याची वरात, 'जगात भारी कोल्हापुरी' थाट पाहून सगळेच अवाक्

Continues below advertisement
जगात भारी कोल्हापुरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात (Kolhapur) एक आगळीवेगळी वरात चर्चेचा विषय ठरली आहे. येथील शिंगणापूरमध्ये एका नवदाम्पत्याची वरात चक्क जेसीबीच्या (JCB) बकेटमधून काढण्यात आली. जेसीबी व्यावसायिक असलेल्या वरपित्याने, राजेश दत्तात्रय माने यांनी, आपल्या उच्चशिक्षित मुलाच्या लग्नात हौस म्हणून वरातीसाठी चक्क जेसीबीचाच वापर केला. त्यांच्या मालकीचे चार जेसीबी आणि पोकलेन मशिन्स आहेत, आणि याच व्यवसायाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा अनोखा मार्ग निवडला. या हटके वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वधू-वरांसह नातेवाईक आणि मित्रपरिवारानेही या अनोख्या वरातीचा मनसोक्त आनंद घेतला, ज्यामुळे या लग्नाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola