Shahu Maharaj Jayanti | राजर्षि शाहू महाराज यांची आज 146 वी जयंती, कोल्हापुरात साधेपणाने जयंती साजरी

आरक्षणाचे जनक आणि समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 146 वी जयंती. पण कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे ही जयंती कोल्हापूरमध्ये अत्यंत साधेपणाने करण्यात आली. आज कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शाहू जयंती सोहळा पार पडला. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये येऊन मान्यवरांनी शाहुराजांना अभिवादन केलं. या जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूरमधल्या दसरा चौकातील शाहू महाराज यांचा पुतळाही सजवण्यात आला असून दरवर्षी या जयंतीच्या निमित्ताने मिरवणुका आणि शोभा यात्रांचे आयोजन केलं जातं. पण यंदा साधेपणाने शाहू जयंती साजरी करण्याचा निर्णय करवीरवासियांनी घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola