Jalyukta Shivar | आरे कारशेड स्थलांतर अंगाशी आल्यामुळे जलयुक्त शिवार योजनेची चौकशी : चंद्रकांत पाटील
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर चांगलेच भडकले आहेत. "आम्ही घेतलेले निर्णय केवळ आकसापोटी रद्द करण्याचा सपाटा या सरकारने सुरु केला आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बिनधास्त करा. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा मात्र ही योजना केवळ सरकारची नसून यामध्ये लोकसहभाग देखील होता हे लक्षात घ्या, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.