Chandrakant Patil | ... तर सरकारला विधानभवनात तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील यांचा इशारा
Continues below advertisement
"पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सोमवारच्या आत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचं रान उठवू," असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. पण उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतील सहा मंत्र्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असताना त्यांच्यावर कुठल्याही स्वरुपाची कारवाई होत नाही, असं ते म्हणाले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्या पतीवरील गुन्हा, मराठा आरक्षण यावरुन सरकारवर टीका केली.
Continues below advertisement