Kolhapur Navratri : करवीर निवीसिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई आज त्र्यंबोली देवीच्या भेटीला
Continues below advertisement
नवरात्रीच्या पाचव्या माळेला कोल्हापूरच्या करवीर निवीसिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई टेंबलाईवाडीच्या त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. ललित पंचमीला हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो, पण यंदा चौथ्या माळेलाच ललित पंचमी आल्यानं आज अंबाबाई आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा पार पडला. या दिवशी कोहळा फोडण्याची परंपरा असते. आपल्याला कोहळा मिळावा म्हणून भक्तांचीही तुंबड उडते.
Continues below advertisement