Kolhapur Accident Video : टेम्पोतील सळई कारच्या काचेत घुसल्या, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Kolhapur Accident Video : टेम्पोतील सळई कारच्या काचेत घुसल्या, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

काळ आला होता पण वेळ आली नव्हती!  महामार्गावर धावत्या टेम्पोमधील सळ्या घुसल्या थेट कारमध्ये  कारमधील चालक किरकोळ जखमी  कोल्हापूर जवळच्या कणेरीफाटा इथली अंगावर काटा आणणारी दृश्य  रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडला अपघात

हे ही वाचा

बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या पक्षाला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बीड जिल्ह्यातील नेते रमेश अडसकर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार आहे. रमेश अडसकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आज संध्याकाळी 5 वाजता रमेश अडसकर आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश करणार आहेत. 

आडसकरांची पंकजा मुंडेंचे समर्थक म्हणून ओळख

रमेशराव आडसकर यांची भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळख आहे. विधानसभेवेळी त्यांनी तिकिटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यांना माजलगावातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता.  मात्र, ऐनवेळी मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर केली होती, रमेशराव आडसकर यांनी 2019 मध्ये भाजपाकडून माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यात ते अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. आडसकरांची ओळख आमदार पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक म्हणून होती. रमेश अडसकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola