Kolhapur : ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्याची परवानगी

पंढरपुरातल्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याची मुभा मिळाल्यानंतर, आता ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्याची परवानगी मिळाली आहे.  ज्येष्ठ नागरिकांबरोबरच गर्भवती महिलांना देखील करवीरनिवासीनीचं दर्शन घेता येईल. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. घटस्थापनेपासून राज्यभरातली मंदिरं पुन्हा सुरु झाली. मात्र सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेशबंदी होती. मात्र सरकारनं हे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता प्रमुख देवस्थानांनी ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola