Kokate Rummy Video | कृषीमंत्री Manikrao Kokate विधानमंडळात Rummy खेळताना
Continues below advertisement
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानमंडळात मोबाईलवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये कृषिमंत्री कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. रोहित पवारांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून, राज्यात रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना आणि शेतीचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना कृषिमंत्री मात्र गेममध्ये मग्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रोहित पवारांनी "जंगली रमीपे आव ना महाराज" अशा टॅगलाइनने त्यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेवर अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून अपडेट्स घेण्यात येत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement