Kokan Railway Update : 21 तासांपासून कोकण रेल्वे ठप्प; दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात

Continues below advertisement

Kokan Railway Update : 21 तासांपासून कोकण रेल्वे ठप्प; दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात

Konkan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक 22 तासांपासून ठप्प, रत्नागिरी, खेड, चिपळूणमधून मुंबईसाठी एसटी बस सोडल्या, प्रवाशांची झुंबड

रत्नागिरी: रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे तब्बल 22 तासांपासून ठप्प असलेल्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांना सध्या प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असे कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. मात्र, त्यामध्ये अपयश आल्याने आता रेल्वे प्रशासनाने विविध एक्सप्रेस गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतुकीची सोय केली आहे. विविध स्टेशनवरून खोळंबलेल्या प्रवाशांना एसटी बसेसच्या (MSRTC bus) माध्यमातून इच्छित स्थळी सोडले जाणार आहे. सध्या रत्नागिरी स्थानकातून 25 एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. या बसेस पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.  एसटीच्या बसेसने अडकलेल्या प्रवाशांना थेट मुंबईत सोडले जाईल.
 
तत्पूर्वी काल रात्रीपासून ट्रेनमध्ये अडकून  पडलेल्या प्रवाशांचा रत्नागिरी स्थानकात उद्रेक पाहायला मिळाला. काल रात्रीपासून रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांच्या खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. तसेच शौचालयांमध्ये पाणी नसल्यानेही प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. तसेच रेल्वे प्रशासनाने काल रात्रीपासून कोणतीही ठोस माहिती दिली नाही. नाहीतर एव्हाना आम्ही पर्यायी मार्गाने गेलो असतो. रेल्वेकडून केवळ दोन तासांनी वाहतूक सुरु होईल, असे सांगितले जात होते.  त्यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी प्रचंड संतापले होते. रत्नागिरी स्थानकात पोलिसांनी हस्तक्षेप करत या संतप्त प्रवाशांची समजूत घालण्याचा  प्रयत्न केला. 
 
खेड आणि विन्हेरे दिवाणखाटी या स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे माती रुळावर येऊन कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक सुरु करण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरु आहेत. याठिकाणी जेसीबी मशीन लावून ट्रॅकवरुन माती बाजूला सारली जात आहे. परंतु, जोरदार पाऊस सुरु असल्याने या मातीचा चिखल तयार झाला आहे. हा चिखल ट्रॅकवर पसरला आहे. याठिकाणी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असले तरी ते अपुरे पडताना दिसत आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram