Kishori Pendnekar:लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही,निर्बंध वाढवण्याबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय अपेक्षित

Continues below advertisement

आजच्या घडीला संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, पण मुंबईच्या नागरिकांनी गांभीर्यानं नियमांचं पालन करावं असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. गंभीर रुग्णांसाठी 22 हजारांचे बेड्स राखीव ठेवले आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी देखील काही बेड्स राखीव ठेवले आहेत.  मात्र, सध्या बाधित असलेल्या रुग्णांना लक्षणे दिसत नाहीत. सध्या रुग्णालयात 1 हजार 170 रुग्ण आहेत. रुग्णांची टक्केवारी वाढली तर निर्बंध वाढवावे लागतील. घाबरण्यापेक्षा काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या संकटापासून जनतेला कसे वाचवता येईल याचाच विचार करत आहेत. यासाठी ते तज्ञांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचे पेडणेकर यांनी केले.  संपूर्ण लॉकडाऊन नक्कीच होणार नाही, मात्र काही नागरिक बेफिकीरीनं वागत राहिले तर संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. त्यासाठी निर्बंधात वाढ करावी लागले असेही त्या म्हणाल्या. सध्या डॉक्टर, बेस्ट कर्मचारी बाधित होत आहेत. सध्या बेड्स रिकामे आहेत, त्यामुळे काही निर्णय घेत नाही आहोत असे त्या म्हणाल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram