Kishori Pednekar On MAhesh Kothare ...म्हणून महेश कोठारेंची मोदी, भाजपवर स्तुतिसुमनं - किशोरी पेडणेकर

Continues below advertisement
ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपची (BJP) स्तुती केल्यानंतर शिवसेना (UBT) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'ते कलाकार आहेत, बरोबर आहेत, पण सुनबाई एका अॅक्सिडेंटमध्ये अडकलेल्या आहेत, त्यांना कसं वाचवायचं? त्यासाठी अशी मुक्ताफळं उधळावी लागतात,' असा थेट आरोप पेडणेकर यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी महेश कोठारे यांची सून, अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) यांच्या कारला अपघात झाला होता, ज्यात एका मजुराचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणातून सुनेला वाचवण्यासाठी कोठारे भाजपची स्तुती करत असल्याचा दावा पेडणेकरांनी केला आहे. तसेच, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं, पण शौर्यासोबत क्रौर्यही दाखवलं,' असे वादग्रस्त विधान करत त्यांनी एका विशिष्ट समाजावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola