Political Spat: 'सुनबाई Accident मध्ये अडकल्यात, कसं वाचवायचं?', Mahesh Kothare यांच्यावर Kishori Pednekar यांचा थेट आरोप
Continues below advertisement
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची स्तुती केल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आरोप केला आहे की, 'सुनबाई अडकलेय एका अॅक्सिडेंटमध्ये, कसं वाचवायचं?' पेडणेकरांच्या मते, काही दिवसांपूर्वी महेश कोठारे यांची सून, अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) हिच्या गाडीला झालेल्या अपघाताच्या प्रकरणातून तिला वाचवण्यासाठीच कोठारे यांनी हे विधान केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उर्मिला कोठारे यांच्या कारच्या धडकेत एका मजुराचा मृत्यू झाला होता, ज्या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली होती आणि तपास सुरू आहे. महेश कोठारे यांनी आपण मोदींचे भक्त असल्याचे सांगत मुंबईत कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला होता, ज्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement