Kisan Sabha Protest : दुधाच्या हमीभावासाठी किसान सभा आक्रमक, दूध ओतून सरकारचा निषेध

दुधाच्या हमीभावासाठी किसान सभा आक्रमक झालीय.संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर किसान सभेने भव्य मोर्चा आयोजित केलाय. प्रांत कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. किसान सभा नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांच्यासह सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने दखल न घेतल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा किसान सभेने दिला. सरकारने काढलेल्या आदेशालाही दूध संघ महत्व देत नसल्याचा आरोप किसान सभेने केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola