Kisan Long March : तोडगा निघाल्याशिवाय माघार नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चेपूर्वी शेतकऱ्यांची भूमिका

Continues below advertisement

Kisan  Long March : तोडगा निघाल्याशिवाय माघार नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चेपूर्वी शेतकऱ्यांची भूमिका

शेतकऱ्यांचं लाल वादळ एक एक पाऊल टाकत मुंबईच्या दिशेने सरकतंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकपासून विधानभवनाकडे निघालेलं पायी वादळ आता मुंबईच्या दिशेने रवाना झालंय. मोर्चाचा आजचा पाचवा दिवस आहे.   दरम्यान  या मोर्चावर तोडगा काढण्यासाठी सरकारही चर्चा करतंय. काल मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांची शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली त्यानंतर  आज दुपारी 3 वाजता मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबधित खात्याचे मंत्री, सचिव यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी जे पी गावीत यांच्यासोबतच शेतकऱ्यांचं शिष्ठमंडळही मुंबईच्या दिशेने रवाना झालंय. आता आज होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणार का लाल वादळ शमणार का  हे पाहावं लागेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram