शरद पवारांच्या मार्गदर्शनानंतरच माझ्यावर कारवाई, मुख्यमंत्री-गृहमंत्री एकचे हे करू शकत नाही : Kirit Somaiyya
Continues below advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मविआ सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तथाकथित घोटाळ्याची आणि त्यांनी जमवलेल्या संपत्तीची माहिती देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूरला पोहोचणार होते. पण त्यापूर्वीच ज्यांच्याकडे गृहविभाग आहे त्याच राष्ट्रवादीने किरीट सोमय्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावरून भाजपने चांगलेच रान उठवले. मात्र यात शिवसेना बदनाम होत असल्याचे पाहून शिवसेनेने या पोलीसी कारवाईत आमचा काहीही हात नसल्याचे सांगत हात वर केले आहेत आणि सर्व जबाबदारी राष्ट्रवादीवर फोडून मोकळे झाले आहेत. यावरून मविआ सरकारमध्ये विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress Kolhapur Ncp Shivsena Sharad Pawar BJP Mahalaxmi Express Kirit Somaiyya Karad Hasan Mushrif Mahavikas Aghadi BJP