Kirit Somaiya :सोमय्यांचे आरोप सरपंचांनी खोडून काढले,कोलई गावातून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट: ABP Majha


भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अन्वय नाईक, रश्मी ठाकरे आणि निशा वायकर यांनी नावं घेतलेली आहेत. १९ बंगल्यांचा व्यवहार कोर्लई गावात झाला होता असा आरोप सोमय्यांनी केला आहे. यावर नाईक कुटुंबियांनी प्रतिक्रिया देताना सोमय्या नाईक कुटुंबीयांना यात ओढून मानसिक छळ करत असल्याचा आरोप अक्षता नाईक यांनी केला आहे. सोमय्यांनी अन्वय नाईक यांचे नाव घेणं एका महिन्याच्या आत थांबवले नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन मानहानिचा दावा करु असं देखील त्या म्हणाल्या. सोबतच यासंदर्भात महिला आयोगाकडे जात तक्रार देखील दाखल करण्याच्या असं अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्यात. सोबतच जो व्यवहार झालाय तो क्रिस्टल क्लीअर आहे. जर सोमय्यांना गैरव्यवहार वाटला असेल तर त्यांनी त्यावेळी व्यवहार झाला तेव्हाच का तो बाहेर आणला नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. यासंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी… 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola