Kirit Somaiya On Sanjay Raut : संजय राऊतांच्या शांततेचं कारण माहितीय, पण डर्टी 12 वर कारवाई होणारच

Continues below advertisement

Kirit Somaiya : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधाने ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच केंद्र विरुद्ध राज्य असा सामना राज्यात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल झालं आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांची लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये आणखी दोन नावांचा समावेश करण्याचे मी विसरलो होतो. यामध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचे कुटुंब आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्लीl विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram