Bhavana Gawali यांच्या 100 कोटींच्या घोटाळ्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर समाधानी : Kirit Somaiya
Continues below advertisement
यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांच्या संबंधित काही संस्थांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. आज खासदार भावना गवळीच्या संबंधित काही संस्थांच्या चौकशीसाठी वाशिम येथे ईडीच्या टीम दाखल झाल्या आहेत. दरम्यान, भावना गवळी यांचं घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढण्यात आली असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
एकेकाळी भावना गवळींच्या वडिलांचा सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली आहे. त्यानंतर हे प्रकरण भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरले. एवढेच नाही तर सोमय्यांनी वाशीमला येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha ED Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Kirit Somaiya Washim ED Raid ABP Majha Bhavana Gawali ABP Majha Video Mahaeashtra Politics