Kirit Somaiya पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ, आर्थिक गुन्हे शाखेचं सोमय्यांना समन्स : ABP Majha
Continues below advertisement
बातमी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्याचे पुत्र नील सोमय्या यांच्या वाढत्या अडचणींची... आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी किरीट सोमय्यांपाठोपाठ त्याचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळलाय... त्यानंतर पोलिसांनी सोमय्या पितापुत्रांना समन्स बजावलंय. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या नॉट रिचेबल झालेत.. त्यामुळे काल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं पथक सोमय्यांच्या मुलुंडमधल्या कार्यालयात धडकलं आणि त्यांनी समन्सची प्रत चिटकवलीय.. किरीट आणि नील सोमय्या यांना हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलीए... हजर न राहिल्यास मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे...
Continues below advertisement