Rijiju Vs Rahul: 'राहुल गांधींचा Atom Bomb कधी फुटला का?', किरेन रिजिजूंचा खोचक सवाल

Continues below advertisement
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हरियाणा निवडणुकीतील (Haryana Elections) 'व्होट चोरी'च्या आरोपांवरून रिजिजूंनी राहुल गांधींच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'आम्ही २००४ मध्ये हरलो, पण आम्ही निवडणूक आयोग किंवा मीडियाला दोष दिला नाही', असे म्हणत रिजिजूंनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवरूनही टीका केली आणि म्हटले की संसद किंवा निवडणुका चालू असताना ते थायलंड, कंबोडियासारख्या देशांमध्ये जातात. रिजिजूंनी हरियाणातील काँग्रेसच्या अंतर्गत वादावरही बोट ठेवले, जिथे कुमारी शैलजा म्हणाल्या की काँग्रेस नेतेच हरवण्यासाठी काम करत होते. राहुल गांधी कोणत्याही विषयावर गंभीर नसतात, असे म्हणत त्यांनी त्यांच्या 'अॅटम बॉम्ब' आणि 'हायड्रोजन बॉम्ब'च्या वक्तव्यांची खिल्ली उडवली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola