Kiran P Gosavi Arrested : किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात, अटकेची प्रक्रिया सुरू

Continues below advertisement

KP Gosavi Arrested : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पंच प्रभाकर साईलच्या (Prabhakar Sail) आरोपांमुळे या प्रकरणाला अनेक वळणं मिळाली आहेत. अशातच साईलच्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीनं (Kiran Gosavi) सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे.  प्रभाकर साईल (Prabhakar Sail) आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणातील पंच आहे. तर दुसरा पंच असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. प्रभाकर साईलनं माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram