Khed Shivapur Toll Naka हटाव आंदोलनाला यश; पुणे-पिंपरीतील गाड्यांना टोलमाफ | ABP Majha
खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या आंदोलनाला यश आलंय. टोल प्रशासनाने कृती समितीच्या काही मागण्या मान्य केल्याचं लेखी दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आलंय. आठ दिवसांसाठी भोर, वेल्ला, मुळशी, खडकवासला, हवेली, पुरंदर आणि पुणे भागातील वाहने मोफत सोडण्याचं आश्वासन देण्यात आले. पुढील आठ दिवसांसाठी टोल प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पुण्याहून सातार्याला जाताना दोन मार्गिका आणि साताऱ्यावरुन पुण्याला येताना दोन मार्गिका उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.