Khed Rain Damage : पूर ओसरला, खेड बाजारपेठेत चिखल; नगरपरिषदकडून रस्ते स्वच्छ करण्यास सुरुवात
Khed Rain Damage : पूर ओसरला, खेड बाजारपेठेत चिखल; नगरपरिषदकडून रस्ते स्वच्छ करण्यास सुरुवात
ही बातमी पण वाचा
मोठी बातमी! खेड तालुक्यात कोसळली दरड, अनेक गावांचा संपर्क तुटला
landslide in Ratnagiri Khed : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यातील अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याची (landslide) घटना घडली. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्यानं बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली आहे. तेव्हापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दोन दिवसांपासून खेड तालुक्यात जोरदार पाऊस सुरु
गेल्या दोन दिवसांपासून खेड तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या कोसळणाऱ्या पावसामुळं दरड कोसळली आहे. तीन वर्षांपूर्वी याच परिसरात घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 18 गाव बांदरी पट्ट्यात असणाऱ्या अस्तान- धनगरवाडी या ठिकाणी डोंगरावर भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली आहे. ही दरड मुख्य रस्त्यावरती सोमवारी मध्यरात्री कोसळली. त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
भूस्खलनामुळं परिसरात भीतीचं वातावरण
अस्तान गावासोबतच वडगाव, बिरमनी ही गावे देखील दरडग्रस्थ गावे आहेत. भूस्खलनामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत देखील याच गावाशेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून दोन जणांचा जीव गेला होता.