Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान

Continues below advertisement

Khed Dream Deadbody : स्वप्नात डेडबॉडी मर्डरचं गूढ काय? पोलिसांसमोर मोठं आव्हान

खेड तालुक्यातील भोस्ते घाटात सापडला एका पुरुषाचा सापळा, आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडली असतानाच आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्न पडले, त्याने ते खेड पोलिसाना सांगितले आणि त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलले आहे. 

अशीच नोंद पोलिसांच्या एफआयआर मधे सुद्धा करण्यात आली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे १७ सप्टेंबर २०२४ रोजी योगेश पिंपळ आर्या (३०) ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी  येथील आजगांव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलीस स्थानकात दाखल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे.’

योगेश आर्या च्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी केली असता भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधून त्याला टॉवेलने बांधून गळफास घेऊन अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट आणि या पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. तर मृतदेहापासून ५ फुटावर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ ए आय आर कंपनीचे कळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅकमधे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसाना करावा लागणार आहे. 

मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा असे असताना त्याची खबर स्थानिकांना न लागता थेट मृतदेहच सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची खबर स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलीस मृतदेह शोधतात ही गोष्ट विचार करायला लावणारी, अचंबित करणारी आणि तितकीच खळबळजनक आहे. यातून आता कोणते गूढ खेड पोलीस उलगडतात याकडे खेड पोलिसांचे लक्ष लागून राहिले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram