Eknath Khadse | कुणी ED लावली, तर मी CD लावीन.., एकनाथ खडसे यांची फटकेबाजी
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून शुक्रवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. अखेर आज राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.