Kedar Jadav : धोनी आणि फडणवीस,कुणाचं काय भावलं, केदार जाधव EXCLUSIVE
Kedar Jadav : धोनी आणि फडणवीस,कुणाचं काय भावलं, केदार जाधव EXCLUSIVE
माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर राजकारणात आपली इनिंग सुरू करणार आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात केदार जाधव यांनी मुंबईत कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर केदार जाधव यांनी सांगितले की, '2014 मध्ये केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना मिळालेले प्रेम आणि पाठिंबा आणि पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ती मला खूप प्रेरणादायी वाटते. माझे ध्येय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपसाठी काहीतरी छोटे योगदान देणे आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन.