Kailas Kuntewad KBC | बारावी पास शेतकऱ्याची कमाल, YouTube च्या जोरावर जिंकले 50 लाख!

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. कैलास कुंटेवाड या शेतकऱ्याने 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या कार्यक्रमात पन्नास लाख रुपये जिंकले आहेत. अवघे बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या कैलास यांनी आपल्या जिद्द आणि कष्टाच्या बळावर हे यश मिळवले. त्यांनी युट्युबवरील व्हिडीओ पाहून आपले सामान्य ज्ञान वाढवले. दोन एकर कोरडवाहू शेती असूनही, त्यांनी KBC मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले. गेल्या सहा-सात वर्षांपासून ते सातत्याने प्रयत्न करत होते. 'मी जो प्रयत्न करत होतो प्रत्येक वेळेस अपयशी आलंय. पहिले दोन तीन वर्षे तर दुसऱ्या फेरीसाठी कॉल आला नाही. दोन हजार बावीस ला ऑडिशन इंटरव्यूपर्यंत पोहोचलो परंतु फायनल कॉल काही मिळाला नाही पण तरी निराश न होता तेवीस चोवीस मध्ये एकही वर्ष खंड पडू न देता सलग प्रयत्न चालू ठेवले आणि आता दोन हजार पंचवीस ला माझे पूर्ण सर्व स्वप्न पूर्ण झाले,' असे त्यांनी सांगितले. जिंकलेली रक्कम ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola