Karuna Sharma : धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्या आईने टोकाचं पाऊल उचललं होतं- करुणा शर्मा

Continues below advertisement
करुणा मुंडे यांनी त्यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आपल्या आईनं आत्महत्या केली,' असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. २००५ मध्ये आपली बहीण आणि आपण गर्भवती असताना, धनंजय मुंडे यांनी मेहुणीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी आपल्याकडे आईची सुसाईड नोट असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. धनंजय मुंडे केवळ जातीपातीचे राजकारण करत असून, बीडमधील तरुणांच्या नोकरी आणि विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. स्वतःच्या मुलांनाही धनंजय मुंडे न्याय देत नसून, त्यांचा वापर करत आहेत आणि २२ वर्षांच्या मुलाला तीन वर्षांपासून घरात बसवून ठेवल्याने त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही करुणा मुंडे म्हणाल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola