Kartiki Ekadashi: 'टाळ मृदंगाच्या गजरात पंढरी दुमदुमली', शेकडो दिंड्या नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ

Continues below advertisement
आज कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) भक्तीचा महासागर लोटला आहे. अवघी पंढरीगरी टाळ मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. शेकडो वर्षांची परंपरा जपत राज्यभरातून आलेल्या दिंड्या चंद्रभागा नदीत (Chandrabhaga River) पवित्र स्नान करून नगरप्रदक्षिणेसाठी (Nagarpradakshina) बाहेर पडल्या आहेत. या दिंड्यांमध्ये टाळकरी, मृदंगवादक आणि हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. संपूर्ण पंढरपुरात आलेले सर्व वारकरी अशा रीतीने नगरप्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा आपापल्या मठात परतणार आहेत. हा भक्तिमय सोहळा 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी थेट पंढरपुरातून आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola