Karta Shetkari Episode 35 : अनुरूप नाती-गोती : सह्याद्रीफार्म्स : IPH : ABP माझा
Karta Shetkari Episode 35 : अनुरूप नाती-गोती : सह्याद्रीफार्म्स : IPH : ABP माझा
माणसाने एकत्र राहण्याची सुरुवात केली तेव्हा माणसांच्या टोळ्या होत्या. जीवशास्त्रीय दृष्ट्या एकमेकांशी ज्यांचा संबंध आहे अशी माणसंच त्यावेळी एकत्र राहात असत. स्वत:चं अस्तित्व राखण्यासाठी, टिकवण्यासाठी ती माणसं एकत्र राहात होती. त्यांचं विश्व लहान होतं त्यामुळे त्यांच्यातल्या नात्याला प्राधान्य होतं. माझ्यासारखं रक्त ज्याच्या शरीरातून वहात आहे त्याला रक्ताचं नातं म्हटलं जात होतं.बदलत्या काळानुसार माणसाचा अनुभवाचा, नात्यांचा परीघ रुंदावला. केवळ टोळी किंवा प्रदेश ह्या सीमेत त्याची नाती सीमित न राहता, तो जगाच्या परिघात राहणारा माणूस झाला. इतर माणसांशी विचारांच्या, समानतेच्या, जीवनमूल्यांच्या बळावर जोडला जाऊ लागला. ‘हे विश्वची माझे घर’ असताना नात्यांना मर्यादित का करावे? नात्यांविषयीचा आपला दृष्टीकोन विशाल करत ही रक्तापलीकडची नाती जोडता यायला हवी. ही नाती जोडायची कशी? ती टिकवायची कशी? जाणून घेऊया सह्याद्री फार्म्स प्रस्तुत, आवाहन / आय. पी. एच. निर्मित ‘कर्ता शेतकरीच्या’ या भागात राजकुमार तांगडे आणि डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.