Karnatak : कर्नाटकात शिवरायांचा अपमान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं संतापजनक विधान
Continues below advertisement
बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद कोल्हापूर आणि बेळगावात उमटले. शिवभक्तांनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात जमून या घटनेचा निषेध केला. समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केलीय. बेळगावमध्ये सध्या जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. तर कोल्हापुरातील शिवाजी चौकात शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. यावेळी शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबने संदर्भात दिलेल्या प्रतिक्रिये वरून सीमाभागात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Continues below advertisement