Karnatak Border Issue : महाराष्ट्राला डिवचण्याचा कर्नाटककडून आणखी एक प्रयत्न : ABP Majha
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा दुसरा अंक सुरु असतानाच अत्यंत मूलभूत सोईसुविधांच्या अभावाचं कारण देत महाराष्ट्रातील गावांनी आम्हाला आता कर्नाटकात आणि तेलंगणात समाविष्ट करुन घ्या अशी इच्छा व्यक्त केलीय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 14 गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील 14 गावं आणि नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, उमरी, देगलूर, किनवट तालु्क्यातील गावांनीही तेलंगणात सामील होण्याचा इशारा दिलाय.