Coronavirus Outbreak | कोरोनामुळे एकविरा देवीची चैत्री यात्रा रद्द
कोरोनामुळे कार्ल्याच्या एकविरा देवीची चैत्री यात्रा रद्द करण्यात आलीय. एकविरा देवस्थान ट्रस्ट प्रशासकीय मंडळाने हा निर्णय घेतलाय..
कार्ल्याची देवी एकविरा म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराण्याची तसेच समस्त आगरी, कोळी, सिकेपी समाजातील नागरिकांची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. या देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरत असते. या काळात भाविक लाखोंच्या संख्येने देवीच्या दर्शनाला येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या दहशतीमुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.