kargil War : कारगिल युद्धाला 25 वर्ष, पाकिस्तान भारतविरोधी भूमिका सोडू शकेल का?

Continues below advertisement

kargil War : कारगिल युद्धाला 25 वर्ष,  पाकिस्तान भारतविरोधी भूमिका सोडू शकेल का?

१९९९ साली भारतानं पाकिस्तानला धूळ चारली... तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्ताननं एकदाही थेट युद्धाची हिम्मत दाखवली नाही... पण, शेपूट वाकडं ते वाकडंच... कारण, थेट हल्ला करण्याची हिम्मत नसलेल्या पाकिस्तानची घुसखोरी कायम राहिली. सीमा भागात फुटीरतावाद्यांना मदत वाढवली.. आणि दहशतवादाला अजून कुमक पोहचवणे सुरु केली. 
त्यातून मुंबईतील हल्ला असो पाठणकोटमध्ये लष्करी तळावरचा हल्ला असो.. अशा सगळ्याच दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचाच हात होता.. हे उघड झालं.. भारतानंही या भ्याड हल्ल्यांचं निधड्या छातीनं उत्तर दिलं... सर्जिकल स्ट्राईक असो की एअर स्ट्राईक... भारतानंही पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून यमसदनी धाडलं.. गेल्या पंचविस वर्षांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात  सामरिकदृष्ट्या काय बदल झालाय.. याचंच हे एक उदाहरण... याशिवाय आणखी काय काय बदल झालाय. सांगतायेत ब्रिगेडीअर हेमंत महाजन आणि संरक्षणतज्ज्ञ सतीश ढगे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram