Kargil Vijay Divas : कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांना देशभरात आदरांजली, लष्कराकडूनही अभिवादन
Continues below advertisement
देशभरात कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांना आदरांजली वाहण्यात येतेय. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध भूमी इथं जाऊन शहिदांना आदरांजली वाहिलीय. तसंच लष्कराच्या तिन्ही दलांकडूनही शहिदांना अभिवादन करण्यात आलं. भारतीय सीमारेषेवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानाला 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने पिटाळून लावले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पुन्हा एकदा मायभूमीवर तिरंगा फडकवला. या युद्धात भारतीय सैन्याच्या 527 जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्यामुळेच आज कोट्यवधी भारतीयांकडून आणि सैन्य दलाकडून या वीरपुत्रांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
Continues below advertisement