Belgaum : बेळगावसह सीमाभागात आज काळा दिवस, कानडी पोलिसांची दडपशाही सुरु ABP Majha
बेळगावसह सीमाभागात कानडी पोलिसांनी दडपशाही सुरु केली आहे. आज काळा दिवसानिमित्त बेळगावात धरणे आंदोलन करण्यात येणार होतं. या आंदोलनात सहभागी न होण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत, तर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंच्या घरासमोर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दडपशाहीनंतरही तरुण कार्यकर्ते काळे कपडे परिधान आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.