कंगना रनौतकडून न्यायाधीश बदलण्याची मागणी, अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगनाचे गंभीर आरोप
मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत आज अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहिली. आता या प्रकरणाची सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीनंतर कंगना रनौतकडून न्यायाधीश बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगनाने आरोप केले आहेत. आजच्या सुनावणीत कंगना कोर्टापुढे हजर झाली नाही तर तिच्या नावे अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला दिली होती. या खटल्याविरोधात कंगनानं दाखल केलेली याचिका नुकतीत मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती.