Jarange Murder Plot: 'Dada Garud शी संबंध नाही, दलितांचा बळी देऊ नका', Kanchan Salve आक्रमक
Continues below advertisement
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपानंतर, या प्रकरणात नाव आलेल्या कांचन साळवे (Kanchan Salve) यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दादा गरूडसोबत (Dada Garud) कोणताही संबंध असल्याचा इन्कार केला असून, आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दादा गरूड प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे. 'माझा आणि दादा गरूडचा काही संबंध नाही, माझी सीबीआय चौकशी करा,' असे कांचन साळवे म्हणाल्या. 'अमोल खुणे (Amol Khune) हे माझ्या मित्राचे नातेवाईक असून, त्यांच्यामार्फत गरूड साहेबांकडे (मुंडे) जाण्याचा प्रयत्न करत होता व पैशांची मागणी करत होता. प्रत्येक वेळी दलितांचा बळी जाऊ नये,' असेही त्यांनी म्हटले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement