Kamlesh Kamtekar Rickshaw Driver:जॉब गेलेला ग्राफिक डिझायनर ते रिक्षाचालक,कमलेशचा प्रेरणादायी प्रवास

Continues below advertisement

Kamlesh Kamtekar Rickshaw Driver:जॉब गेलेला ग्राफिक डिझायनर ते रिक्षाचालक,कमलेशचा प्रेरणादायी प्रवास
मुंबई : आयुष्यात लाख संकटे येत असतात, मात्र जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करतात, विजयश्री अशाच्याच गळ्यात विजयाची माळ घालत असते. याचे उत्तम उदाहरण मुंबईतल्या कांदिवलीमधून पुढे आले आहे.  ही काहणी आहे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या अशा मराठी तरुणाची, ज्याची एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या तूफान वायरल झाली, आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक व्हायला लागलंय. कॉर्पोरेट क्षेत्रात 14 वर्षाचा ग्राफिक डिझायनरचा अनुभव असताना एक दिवस अचानक नोकरी जाते. पाच महिने नोकरी मिळेल याची तो वाट बघतो, आणि शेवटी नोकरी मिळाली नाही म्हणून रडत न बसता थेट नवी कोरी रिक्षा घेऊन ऑटो रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करायचा निर्णय घेतो. हा धाडसी निर्णय घेणारा कमलेश कामतेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. शिवाय कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक तरुणाला शिकवण देणारी त्याची ही कहाणी अनेकांना प्रेरणादायी आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram